पुणे

दौंड मधून खाद्यतेलाचा ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना बेड्या..!

टॅंकरमधून तेल चोरी चालूच..! मग ते खाद्यतेल असो वा पेट्रोल-डिझेल 

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

लोणी काळभोर हद्दीत टॅंकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी प्रकरण गाजत असतानाच दौंड तालुक्यात खाद्यतेलाचे चोरी प्रकरण पुढे आले आहे. पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या खडकी (ता. दौंड) हद्दीत एका हॉटेल परिसरात एका टॅंकरमधून खाद्यतेल काढताना चौघांना पोलिसांना रंगेहाथ पकडले आहे. हि घटना शनिवारी (ता. १३) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी विजय कैलासनाथ यादव (वय-३२), राजेश अरूण बाविसकर ( वय-२४), रा. दोघेही कृष्णान सोमजाईवाडी, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड), सोपान दादाराव कथिळकर (वय-३०, रा. कटफळ धामणगाव, ता. मोष, जि. अमरावती), सुनील भानुदास देवकाते (रा. न्हावी ता. इंदापुर. सध्या रा. खडकी, ता. दौंड) अशी ताब्यात घेतलेल्या चार आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार गोरख एकनाथ मलगुंडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गाच्या खडकी ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल डी. पॅलेससमोरील मोकळ्या जागेत शनिवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका टॅंकर मधील तेल काही इसम काढून वेगवेगळ्या ड्रममध्ये भरत असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळेस पोलीस कर्मचारी गोरख मलगुंडे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केले असता चार इसम हे टॅंकर मधील तेल काढून बाजूला ठेवलेल्या ड्रममध्ये ओतत असताना दिसून आले. त्यांनी तत्काळ चारही आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने सांगितेले कि, ३८ हजार लिटर हायड्रोजेनेटेड व्हेजिटेबल तेल त्याची प्रतिकिलो ७२ रुपये प्रती लिटर आहे. व त्याची मूळ किमंत हि २७ लाख ३६ हजार रूपये आहे. त्यातील टँकरमधून दोन वेगवेगळ्या ड्रममधून ७० लिटर तेल काढले आहे. दरम्यान, एका हिरव्या रंगाचे २० लिटरचे प्लास्टिक कॅण्ड टैंकरमधील हायड्रोजेनेटेड व्हेजेटेबल ऑईलने भरलेले ड्रम असा एकूण ६२ लाख ४३ हजार ९२० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button