breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मुख्यमंत्र्यांच्या भावाला ईडीचं समन्स; खत घोटाळ्याप्रकरणी चौकशी

नवी दिल्ली |

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे बंधू अग्रसेन गेहलोत यांना कथित खत घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) समन्स जारी केले आहे. अग्रसेन गेहलोत यांना आज जयपूरमधील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षीही ईडीने त्यांना समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते, मात्र ते त्यावेळी चौकशीसाठी गेले नाहीत. जोधपूरसह राज्यातल्या सहा ठिकाणी, पश्चिम बंगालमधील दोन ठिकाणी, गुजरातमधील चार ठिकाणे आणि दिल्लीतही त्यांचा शोध घेतला गेला. राजस्थान हायकोर्टाने अग्रसेन गेहलोत यांच्या अटकेला गेल्या आठवड्यात स्थगिती दिली होती, त्यात नमूद केले होते की ते ईडीच्या तपासात सहकार्य करतील.यूपीए सरकार सत्तेवर असताना २००७ ते २००९ दरम्यान अनुदानित खताची निर्यात केल्याचा आरोप अग्रसेन गेहलोत यांच्यावर आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, २००७ ते २००९ या कालावधीत अग्रसेन गेहलोत यांनी षडयंत्र रचून मोठ्या प्रमाणात म्युरिएट ऑफ पोटॅश (एमओपी) परदेशात निर्यात केले जे भारतीय शेतकऱ्यांना अनुदानित दराने पुरवण्यात आले होते. “एमओपी हा देशातील गरीब शेतकऱ्यांसाठी होता. अग्रसेन गेहलोत यांनी त्यांच्या कंपनी अनुपम कृषी यांच्यामार्फत एमओपी अनुदानित दराने विकत घेतला आणि नंतर मलेशिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांना ते उच्च दराने विकले”, असे ईडीने गेल्या वर्षी शोध घेतल्यानंतर सांगितले होते. याप्रकरणी सीमाशुल्क विभागानेही गुन्हा दाखल केला आहे. कस्टमच्या आरोपपत्राच्या आधारे, ईडीने अग्रसेन गेहलोतसह तीन कंपन्या आणि त्यांच्या मालकांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. नंतर अग्रसेन गेहलोत यांना ६० कोटी रुपयांचा दंड भरण्यास सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button