breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

INX media case : काँग्रेस नेत्याच्या मुलाची ११ कोटीची संपत्ती ईडीकडून जप्त

INX media case : काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची कर्नाटकातील ११.०४ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहेत. आयएनएक्स मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

याआधी या प्रकरणात त्यांना सीबीआयने अटकही केली होती. तसेच त्यांच्यावर २०११ मध्ये २६३ चीनी नागरिकांना व्हिसा जारी करण्यात कथित अनियमिततेच्या संदर्भात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे.

काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिंदबरम यांचे पुत्र कार्ती चिंदबरम हे तामीळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. त्यांनी सीबीआय आणि ईडी या दोन्हींकडून आयएनएक्स प्रकरणात अटक करण्यात आली होती.

काय आहे नेमकं प्रकरण ?

आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती यांना अटक करण्यात आली आहे. लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कार्ती यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आयएनएक्स मीडियामध्ये २००७ साली ३०० कोटींची परकीय गुंतवणूक गैरपद्धतीने आणण्यासाठी कार्ती यांनी साडेतीन कोटी लाच घेतल्याचा आरोप आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात म्हणजे पी.चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्रीपद असताना हा प्रकार उघड झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button