breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीकडून अटक

मुंबई । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate) अटक केल्याचे वृत्त आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणाची चौकशी पाठीमागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. ईडीने एकनाथ खडसे यांनाही अनेकदा समन्स पाठवले आहे. मात्र प्रकृतीच्या कारणास्त एकनाथ खडसे ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, आता त्यांच्या जावयाला अटक झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणि इडीची कारवाई कुठपर्यंत पोहोचते याबाबत उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणूक 2014 नंतर महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती सरकार सत्तेत आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. याच काळात खडसे यांनी आपल्या पत्नी मंदानिकी खडसे यांच्या नावावर भोसरी एमआयडीसी येथे एक भूखंड खरेदी केला. या भूखंड खरेदीवरुनच एकनाथ खसडे यांच्यावर बेकायदेशीररित्या भूखंड खरेदीचा आरोप झाला.

एकनाथ खडसे यांच्यावर आरोप आहे की, भोसरी येथील भूखंड एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्री पदाचा गैरवापर करुन मिळवला. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर ही चौकशी सुरु झाली. प्रकरण असे आहे की, एकनाथ खडसे यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेला भूखंड हा सर्वसाधारण व्यवहार असला तरी तो भूखंड एमआयडीसीचा असल्याचा दावा आहे. त्यामुळे खडसे यांनी एमआयडीसीचा भूखंड खेरीद केला आहे का? याबाबत आणि त्या अनुषंघाने झालेल्या सर्व व्यवहारांची आता चौकशी होत आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आमदार असताना विधासभेत अनेकदा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आवाज उठवला होता. माझ्यावर झालेल्या आरोपांची सत्यता दाखवा अन्यथा मला निर्दोष म्हणून जाहीर करा. माझ्यावर चौकशीसाठी नेमलेल्या कोणत्याही समितीचाही अहवाल अद्याप आला नाही. तो अहवाल का प्रलंबित ठेवला आहे असे सवालही खडसे यांनी केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button