breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत साकारला ‘इको जॉगिंग ट्रॅक’; महापालिका प्रशासनाचा रोल मॉडेल प्रकल्प

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीच्या वर्दळ नेहमीच पहायला मिळते. मात्र, याच मार्गालगत मोकळ्या जागेत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ‘इको जॉगिंग ट्रॅक’ विकसित केला आहे. त्यामुळे कामगार, नागरिकांची सुविधा झाली असून, या प्रकल्पाबाबत सर्वसामान्यांमधून प्रशासनाचे कौतूक करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख इतकी आहे. नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा. नियमित व्यायाम करता यावा. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत.
‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने यशस्वी वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील सामान्य नागरिकांना चांगली जीवनशैली देण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता शहरात ठिकठिकाणी ‘इको जॉगिंग ट्रॅक’ विकसित केले आहेत. पुणे-नाशिक महामार्गालगत सीआयआयटी कार्यालयापासून ते लांडेवाडी येथील स्वागत कमानीपर्यंत सुमारे २ हजार मीटर लांबीचा इको जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात आला असून, त्याचे काम पूर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने दर्जेदार काम केले असून, सर्वसामान्य कामगार वर्गातून या प्रकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी हितकारक…

धावपळीच्या युगात सर्वसामान्य नागरिकांना नियमित व्यायाम आणि सुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. स्वच्छ सव्हेक्षणात महापालिका प्रशासनाने सहभाग घेतला आहे. पूर्वी याच ट्रॅकच्या जागेत बांधकाम राडारोडा आणि कचरा फेकला जात होता. त्यामुळे शहराचे एकप्रकारे विद्रुपिकरण चव्हाट्यावर येत होते. यामुळे महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत इको जॉगिंग ट्रॅकचे काम हाती घेतले. या ट्रॅकवर नियमित चालणे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासाठी आरोग्यदायी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नाशिक फाट्यापासून भोसरीकडे जाताना या भागामध्ये मोकळ्या जागेत पूर्वी नियमबाह्यपणे राडारोडा आणि कचरा टाकला जात होता. महापालिका प्रशासनाने ‘इको जॉगिंग ट्रॅक’ विकसित केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगली सुविधा मिळाली आणि जागेचा सदुपयोगही झाला. सामान्य नागरिकांसाठी प्रशासनाने घेतलेला हा प्रकल्प निश्चितच स्वागतार्ह आहे.
– अभिषेक तगडे, नागरिक, भोसरी.

‘ इको जॉगिंग ट्रॅक’चे काम अत्यंत दर्जेदार झाले आहे. प्रशासनाने अत्यंत चांगला प्रकल्प हाती घेतला होता. या भागात पूर्वी प्रचंड अस्वच्छता होती. प्रशासनाने या भागातील एकही झाड हटवलेले नाही. या ठिकाणी महावितरणचे काही पोल ठेवले होते. ते महावितरण प्रशासनाने काढून घेतले. मोकळ्या जागेचा चांगला उपयोग करुन सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार सुविधा झाली आहे.
– सतीश केदार, सहाय्यक अभियंता, महावितरण, दापोडी.

‘सीआयआयटी’ ते लांडेवाडी येथील स्वागत कमान भागत पूर्वी खूप अस्वच्छता दिसत होती. या भागात औद्योगिक कंपन्या आणि शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे कर्मचारी, कामगारांची वर्दळ असते. भोसरी पोलीस ठाणेही या ठिकाणी असल्यामुळे नागरीक येथे ये-जा करतात. या भागाचे सुशोभिकरण झाले आणि चांगले काम केले आहे.
– सोमनाथ पठाडे, सहाय्यक अभियंता, महावितरण, कासारवाडी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button