TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

प्रजासत्ताक दिनी पिंपरी-चिंचवडमध्ये ई-कचरा संकलन मोहीम राबविणार

पिंपरीः गत वर्षीपासून पूर्णम् इकोविजन, पर्यावरण संरक्षण गतिविधी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शहरातील अन्य स्थानिक सामाजिक संस्था एकत्रितपणे ‘ई-यंत्रण’ मोहीम शहर स्तरावर राबविण्यात येणार आहे. यंदाही २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत ही मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये सुमारे १५० संकलन केंद्रे उभारली जाणार आहेत. या केंद्रांवर ई-कचरा संकलित केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने सर्व पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, जास्तीत जास्त संख्येने या मोहीमेत सहभागी होऊन, प्रतिसाद द्यावा .

संकलित केलेल्या ई-कचऱ्याचे , वर्गीकरण करण्यात येणार आहे. दुरुस्त होऊ शकणारे लॅपटॉप आणि कॉम्प्यूटर दुरुस्त करून गरजूंना दान केले जाणार आहे… राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लॅपटॉप आणि कॉम्प्युटर दान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. उरलेला ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा , शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे, नोंदणीकृत संस्थांना सुपूर्त केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी https://poornamecovision.org/events/mega-drives/eyantran-2023-pcmcs-largest-e-waste-collection-drive या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button