breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pimpri : शाळेच्या कामामुळे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, रुग्णांची गैरसोय

आकुर्डी : काळभोरनगर मधील बालाजी चौकातील शाळेचे बांधकाम सुरू असल्याने आशा किरण हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. वाहनांना जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.परिणामी रुग्णांना उचलून नेण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे. या रुग्णालयात गरोदर महिला, विविध रुग्ण दाखल झालेले आहेत.

आशा किरण हॉस्पिटलच्या लगत एका शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. कामासाठी साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हॉस्पिटलकडे जाणारा संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. या चिखलामुळे वाहने हॉस्पिटलकडे जावू शकत नाहीत. चालत जावे लागत आहे. वयोवृद्ध रुग्ण, गरोदर महिलांना उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठा कामगिरी! ९० दिवसांत ४४७ कोटींची वसूली

याबाबत रुग्णांकडून हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार केली आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी संवाद चालू आहे. रस्ता सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हॉस्पिटलमधील डॉ. रोहित शुक्ला यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button