breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘मला मुख्यमंत्री करा, अन्यथा…’; काँग्रेस नेत्याने अध्यक्षांकडे मांडली भूमिका

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत १३५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे आपली भूमिका मांडली आहे.

डीके शिवकुमार म्हणाले की, सिद्धारामय्या यांना आधीच मुख्यमंत्री बनण्याची संधी देण्यात आली होती. आता मुख्यमंत्री बनण्याची माझी पाळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याची संधी मला मिळायला हवी. मला मुख्यमंत्री करा, अन्याथा मी केवळ आमदार म्हणून पक्षात काम करणं पसंत करेन. तसेच २०१९ मध्ये काँग्रेस सरकार केसळल्यानंतर राज्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यात मदत केली, असं डीते शिवकुमार म्हणाले. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

हेही वाचा – डॉ. प्रदीप कुरूलकरचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट असे झाले ‘रिकव्हर’

कर्नाचकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे दोन नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button