TOP Newsताज्या घडामोडीपुणे

डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सम्यक पुरस्कारांचे रविवारी पुण्यात वितरण

पुणे : समाजपरिवर्तनाच्या कार्यात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या बारा व्यक्तींना ‘सम्यक पुरस्कार २०२२’ देऊन रविवारी पुण्यात गौरविण्यात येणार आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंदिर येथे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान,मातंग युवा परिषद आणि सम्यक पुरस्कार वितरण समिती यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रकाशकुमार वाघमारे दिग्दर्शित ‘भीमा तुझ्या जन्मामुळे … ‘ या महानाट्याचा ५० वा प्रयोग या कार्यक्रमात होणार आहे.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव साळवे,अंकल सोनवणे तसेच पिंपरी-चिंचवड मनपाचे उपायुक्त सचिन ढोले हे मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद अहिरे,संजय आल्हाट आणि नागेश भारत भोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नाथाभाऊ भोसले,रोहिदास गायकवाड,अशोक पगारे,रामदास साळवे,मिलिंद गायकवाड,अभय भोर,राहुल डंबाळे,जावेद खान,पंकज धिवार,अविनाश कांबळे,दीपक गुजर, सोमनाथ डाके या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘सम्यक पुरस्कार २०२२’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button