breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शाहूनगरमध्ये चोरट्यांनी मारला सव्वालाखांच्या दागिन्यांवर डल्ला

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी 1 लाख 12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवड येथील शाहूनगरमध्ये अभिजीत हौसिंग सोसायटीमध्ये घडली.

याप्रकरणी सपना महानतय्या पुजारी (वय 50, रा. फ्लॅट नंबर 04, प्लॉट नंबर आरएम 103, अभिजीत हौसींग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना पुजारी सोमवारी (दि. 2) सकाळी साडेसातच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. मंगळवारी (दि. 3) सकाळी अकराच्या सुमारास त्या घरी परतल्या, त्यावेळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने 1 लाख 12 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले होते. एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button