breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : चेन्नईकडून पंजाबचा 10 विकेट्सनी धुव्वा

दुबई – IPL 2020मध्ये पहिला सामना जिंकल्यानंतर सलग ३ सामने हरणाऱ्या चेन्नईने रविवारी जबरदस्त कमबॅक करत किंग्ज इलेव्हन पंजाबचा तब्बल १० विकेट्स राखून दणदणीत पराभव केला. या मोसमातील चेन्नईचा हा दुसरा विजय आहे. या सामन्यात प्रथम खेळत पंजाबने 20 षटकांत चार गडी गमावून 178 धावा केल्या होत्या. ते पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईने एकही गडी न गमावता 17.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. चेन्नईच्या सलामीवीरांना बाद करण्यात पंजाबच्या एकाही गोलंदाजाला यश आले नाही. चेन्नईकडून शेन वॉट्सन (८३) आणि फॅफ डू प्लेसिस (८७) या दोघांनी पंजाबने ठेवलेले आव्हान अगदी सहजरीत्या पार केले.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबची सुरुवातदेखील दणदणीत झाली. राहुल (६३) आणि मयांक अगरवाल (२६) या दोघांनी पंजाबला ६१ धावांची सलामी दिली. अगरवाल बाद झाल्यानंतर आलेल्या मनदीप सिंगनेदेखील २७ धावांची मोलाची भर घातली. निकोलस पूरणनेदेखील अवघ्या १७ चेंडूंमध्ये ३३ धावा तडकावून संघाची धावसंख्या १७व्या षटकातच १५२ पर्यंत नेऊन ठेवली. मात्र त्यानंतर पुढच्या ३ षटकांत पंजाबला केवळ २८ धावांची भर घालता आली.

पंजाबच्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसनने तुफान फटकेबाजी करत चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला. वॉटसनने 53 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा केल्या. तर प्लेसिसने 53 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 87 धावा फटकावल्या. या मोसमातील वॉटसनचे हे पहिले अर्धशतक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button