पिंपरी / चिंचवड

महाविकास आघाडी काय करायंच ते करा, निवडणुका आम्हीच जिंकू : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

– पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन
– शहरात आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका

पिंपरी । प्रतिनिधी
“सध्याच्या राज्यातील सरकारला महाविकास आघाडी सरकार म्हणायचं की महावसुली सरकार म्हणायचं हा प्रश्न आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरू झाली. याचे श्रेय घ्यायला अनेक लोक येतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही मेट्रो झाली आहे. आम्ही पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केलं आहे. आता हे वॉर्ड बदल वैगेरे करत आहेत. तुम्ही काय करायचं ते करा जनता बघतेय. आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू” असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची सुरूवात फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, माजी खासदार अमर साबळे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अमित गोरखे, उमा खापरे, नगरसेवक एकनाथ पवार, सदाशिव खाडे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, योगिता थोरात, राहुल जाधव, कुंदन गायकवाड, तुषार हिंगे, केशव घोळवे, राजू दुर्गे, उत्तम केंदळे, बाबू नायर, माऊली थोरात आदी उपस्थित होते.
महेश लांडगे म्हणाले की, “निवडणुका जवळ आल्या आहेत. मागच्या पाच वर्षात घोषणा द्यायलाही विरोधकांकडे कोणी नव्हतं. असे ओरडणारे पैलवान मी खूप पाहिलेत. जे ओरडते ते चावत नाही अशी एक म्हण आहे. त्यामुळे मी अशा ओरडणाऱ्या पैलवानांना घाबरत नाही. भाजपच्या नगरसेवकांनी लोकांच्या गरजेची, हिताची कामे केली आहेत. जोपर्यंत आपल्यासोबत शहरातील नागरिक आहेत तोपर्यंत अशांना घाबरायचं नाही. काम दाखव आणि मत माग असं नागरिक म्हणणार आहेत, असेही आमदार लांडगे म्हणाले.
एकनाथ पवार म्हणाले की, “भाजपने समाविष्ट गावांमध्ये हजार ते दोन हजार कोटींचे बजेट दिले आहे. आंदोलकांची लाज वाटते. यापूर्वी तुमची सत्ता होती. पण विकास केला नाही असे विरोधकांना उद्देशून म्हणत पवार म्हणाले, देहूमधून 100 एमएलडी पाणी आणून देत आहोत. मावळातले शेतकरी पिंपरी चिंचवडकरांना पवना धरणाचे पाणी द्यायला तयार आहेत. अटलबिहारी वाजपेयी उद्यान, विवेकानंद क्रीडांगण, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कमान, श्यामाप्रसाद मुखर्जी क्रीडांगण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
***
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. संजय पटनी, प्रसिद्धीप्रमुख, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
मोबाईल क्रमांक : +91 98222 17163

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button