breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

Yoga Bnefits : हिवाळ्यात ‘ही’ योगासने करा आणि आरोग्य तंदुरुस्त बनवा

Yoga Bnefits : हिवाळ्याचा ऋतू सुरू झाल्याने या ऋतूमध्ये व्यायाम करणे शरीरासाठी फायद्याचे मानले जाते. हिवाळ्यात व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील शारीरिक क्रियाशीलता वाढते आणि शारीरिक स्थिती देखील उत्तम राहते. नियमित आसन केल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात व नेमके कोणते आसन केले पाहिजेत याबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेऊयात..

बालासन करण्याचे फायदे :

पाठीच्या समस्या दूर होतात : बालासन करणे शरीरासाठी फार फायदेशीर असे आसन आहे. हे आसन केल्याने पाठीच्या समस्या कमी होतात. तसेच पाठीचा कणादुखत असेल तर हे आसन नक्की करावे. हे आसन केल्याने शरीरातील स्नायू लवचिक होतात, यामुळे स्नायूंना देखील आराम मिळतो व पाठदुखीचा समस्या कमी होतात.

स्नायू लवचिक होणे : ज्या रुग्णांना पाठदुखी, खांदे, मान, पाठ, सांधेदुखी यांसारख्या समस्या आहेत अशा रुग्णांनी हा व्यायाम नक्की करावा. बालासन केल्याने नैराश्य कमी होते व रागावर नियंत्रण राहते. ज्यावेळी शरीरातील स्नायू लवचिक होतात त्यावेळी मन शांत होते व शरीरातील थकवा कमी होतो.

मासिक पाळीचा त्रास कमी होतो : ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान त्रास संभवतो त्या महिलांनी बालासन नियमित करावे. बालासन केल्याने मनातील तणाव दूर होतो त्यामुळे शांती मिळते. मासिक पाळीमध्ये शरीराला ऊर्जेची गरज असते त्यामुळे बालसन नक्की करावे.

त्रिकोनासन व्यायाम करण्याचे फायदे :

आळस, जडत्व कमी होणे : त्रिकोनासन आसन नियमित केल्याने लहान मुलांची उंची वाढते. तसेच शरीरातील आळस, जडत्व कमी होते. याशिवाय फुफुसांची कार्यक्षमता देखील वाढते. ज्या लोकांना मानेचा व पाठीचा त्रास आहे त्या लोकांनी त्रिकोनासन हे आसन नियमित केले पाहिजे.

वजन कमी काणे : त्रिकोनासन आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. त्रिकोनासन केल्याने बालदमा, मधुमेह, चरबी, वजन कमी करणे यांसारखे मोठे आजार कमी होतात. जर वजन कमी कार्याचे असल्यास नियमित 21 दिवस हा व्यायाम करणे महत्वाचे आहे.

शरीरातील लवचिकता वाढते : जर तुम्हाला तुमचे शरीर फारच आखडल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही त्रिकोनासन हे आसन नियमित करणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील लवचिकता वाढते. हे आसन केल्याने पायदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या कमी होतात. याशिवाय ज्या लोकांना वाताच्या समस्या असतील तर त्यांनी हे आसन नक्की करावे. तसेच या आसनाने आत्मविश्वास वाढतो व नैराश्य कमी होण्यास मदतर होते.

हेही वाचा – ‘जरांगेच्या मागणीमुळे मराठा तरूणांचं मोठं नुकसान होणार’; काँग्रेस नेत्याचं विधान 

पश्चिमोत्तानासन करण्याचे फायदे :

पायांच्या समस्सेपासून सुटका मिळते : पश्चिमोत्तानासन हा एक प्रमुख योग आसन आहे ज्यामुळे शरीराच्या पूर्ण भागाचे कार्य सुधारते. पश्चिमोत्तानासन केल्याने पायांचा व्यायाम होतो. या आसनात मानेपासून ते पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व भागाचा ताण पडतो. त्यामुळे या आसनाला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात.

श्वासावर नियंत्रण राहते : पश्चिमोत्तानासन हे आसन केल्याने श्वासावर नियंत्रण राहते. तसेच हे आसन नियमित केल्याने अस्थमा आणि दमा या रोगांपासून सुटका मिळते. त्यामुळे श्वासासंदर्भात समस्या असल्यास पश्चिमोत्तानासन हे आसन नक्की करावे.

प्राणवायुचा शुद्धिकरण : या आसनाच्या सहाय्याने श्वासाच्या प्रवाहाचे शुद्धिकरण होते. तसेच शरीराची ऊर्जा देखील वाढते. पश्चिमोत्तानासन आसन केल्याने शरीरातील रक्तपुरवढा नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारते.

भुजंगासन व्यायाम करण्याचे फायदे :

कमर व उपांती पायांची मजबूती : भुजंगासन हा व्यायाम केल्याने कंबर आणि पायाचे दुखणे कमी होतात. तसेच पायांचे स्नायू लवचिक होतात. त्यामुळे ज्या लोकांना पायांचा त्रास आहे त्यांनी भुजंगासन व्यायाम नक्की करावा.

श्वासवर नियंत्रण मिळते : भुजंगासन व्यायामामध्ये उच्च श्वास प्राणायाम असतात, ज्यामुळे श्वासाचे नियंत्रण होते आणि श्वास घेतल्यानंतर विश्रांती मिळते. तसेच भुजंगासन व्यायाम केल्याने श्वासा संदर्भात आजार असतात ते दूर होतात. तसेच यामुळे फुफुसांचे आरोग्य सुधारते.

हृदय आणि फुफुसांची शक्ती वाढते : भुजंगासन व्यायाम हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या व्यायामामुळे हृदयाची क्रिया सुधारण्यासाठी मदत होते. तसेच महत्वाचं म्हणजे फुफुसांची क्षमता वाढते. हृदयरोग असणाऱ्या रुग्णांनी भुजंगासन व्यायाम नक्की करावा.

मांसपेश्यांची लवचिकता वाढते : सर्वात महत्वाचं म्हणजे भुजंगासन हे आसन शरीरातील लवचिकता वाढवते. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. तसेच हे आसन नियमित केल्याने शरीरावर आलेला तणाव कमी होतो.

अस्थमा आणि दमा व्यक्तींसाठी भुजंगासन व्यायाम करावा : भुजंगासन व्यायाम हा दमा आणि अस्थमा असणाऱ्या रुग्णानांसाठी फार फायदेशीर आहे. भुजंगासन हे आसन नियमित केल्याने अस्थमा आणि दमा या आजारनपासून सुटका होण्यास मदत होते.

टीप : वरील दिलेली संपूर्ण माहिती इंटरनेटच्या मदतीने घेण्यात आलेली आहे. यातील कोणत्याही माहितीची जबाबदारी ज्या लोकांना शरीराच्या गंभीर समस्या असतील अशा रुगणांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वर दिलेले आसन करावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button