breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘ललित पाटील याला मंत्रालयातून मदत झाली’; रवींद्र धंगेकरांचे धक्कादायक विधान

पुणे : ललित पाटीलला ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. तीन वर्षात तो नऊ महिने ससून रूग्णालयात राहिला. त्यानंतर ससून रूग्णालयातून तो फरार झाला. यानतंर हे प्रकरण चांगलच चर्चेत आले आहे. दरम्यान, यावरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ललितला मंत्रालयातून मदत झाली, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले, ललित पाटील याने ९ महिन्यांत कोट्यावधी रुपये वाटले आहे. आजारपणाचे नाटक करुन तो ससून रुग्णालयात राहिला. त्याला ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि पोलिसांनी मदत केली. या काळात ललित पाटील याला पंचताराकीत सुविधा दिल्या गेल्या. त्यासाठी त्याने कोट्यवधी रुपये वाटले. त्यामुळे संजीव ठाकूर यांची नार्को चाचणी केली पाहिजे. त्यातून सत्य बाहेर येईल. केवळ त्यांची बदली करुन काही होणार नाही.

हेही वाचा – Yoga Bnefits : हिवाळ्यात ‘ही’ योगासने करा आणि आरोग्य तंदुरुस्त बनवा

संजीव ठाकूर यांना मंत्रालयातून मदत करण्यात आली. त्याची मंत्र्याशी ओळख आहे. यामुळे या प्रकरणात सत्य बाहेर आणावे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. तसेच संजीव ठाकूर याच्यावर पोलीस कारवाई करावी. ठाकूर यांना सोलापूरवरुन पुण्यात आणले. हे भाजपने त्याचे केलेले पुर्नवसन होते. यामुळे संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट केली पाहीजे. त्यावेळी ललित पाटील याची नार्को टेस्ट केली पाहीजे, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button