Uncategorized

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील वाद शिगेला अन् भाजप आमदाराच्या पीएची गाडीच फोडली

उल्हासनगर: उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी यांचे पीए प्रकाश तलरेजा यांची गाडी काही अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली. मात्र ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामागे उल्हासनगरमधील व्यावसायिक राम वाधवा यांचा हात असल्याचा आरोप तलरेजा यांनी केला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच गाडीच्या तोडफोडीचा सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या घटनेचे धागे दोरे व्हाट्स अ‍ॅप ग्रुप पर्यंत पोहचले.

 

राम वाधवा हे उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक असून ते पूर्वी भाजपचे प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. मात्र नंतर त्यांच्यात आणि भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. त्यातच उल्हासनगरमधील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रकाश तलरेजा यांनी टाकलेल्या पोस्टवरुन राम वाधवा आणि प्रकाश तलरेजा यांच्यात वादविवाद झाले.

 

या घटनेचा मनात राग धरून काही वेळाने प्रकाश तलरेजा यांची गाडी त्यांच्या घराखाली उभी असताना तिथे आले. त्यांनी तलरेजा यांच्या गाडीची मागची काच फोडली आणि पोबारा केला. त्यामुळे हा प्रकार राम वाधवा यांनीच केल्याचा आरोप प्रकाश यांनी केला आहे. पोलीस पुढील तपस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button