Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहराची सात प्रवेशद्वारे होणार ‘स्वच्छ व सुंदर !

प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ‘स्वच्छ व सुंदर, तसेच स्वस्थ नाशिक’ची संकल्पना मांडणारे रमेश पवार यांनी पहिल्या टप्प्यात आता शहरातील सातही प्रवेशद्वारे सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, त्र्यंबकेश्वर, धुळे, दिंडोरी, पेठ आणि औरंगाबादकडून येताना लागणाऱ्या शहरातील प्रवेशद्वारांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पवार यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. यासोबत शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणांची यादी करण्यासह वाहतूक बेटांचीही स्वच्छता करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मंत्र व तंत्रनगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणामुळेही कायमच शहर चर्चत राहिले आहेत. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणाऱ्या गोदावरी नदीचे महत्त्व, तसेच दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे देशभरातून पर्यटक नाशिकमध्ये येतात. यासोबतच त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आणि वाइन कॅपिटलला भेट देण्यासाठी रोज शेकडो पर्यटक नाशिकमध्ये येत असतात. एक उद्योगनगरी म्हणूनही नाशिकचा सर्वदूर लौकिक आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताना सुखद आभास व्हावा अशा पद्धतीची प्रवेशद्वारे असावीत, अशी संकल्पना पवार यांनी मांडली आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वार, तसेच वाहतूक बेटेही विकसित करून नाशिक राहण्यायोग्य शहर तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्मार्ट नाशिकची वेस अर्थात प्रवेशद्वारही भव्यदिव्य आणि आकर्षक करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला आहे. बांधकाम विभागाचा आढावा घेताना, शहरातील सर्व प्रवेशद्वारांची माहिती पवार यांनी घेतली. त्या वेळी बांधकाम विभागाने सात मुख्य प्रवेशद्वारे असून, मुंबई, पुणे, त्र्यंबकेश्वर, धुळे, दिंडोरी, पेठ आणि औरंगाबादकडून येताना ही प्रवेशद्वारे आहेत. विल्होळी नाक्यालगत मुंबई-आग्रा महामार्गावर ‘इनरिचिंग नाशिक’ नावाने विकसित करण्यात आलेल्या वाहतूक बेटावर मिग २१ ची प्रतिकृती बसविण्यात आल्याची माहिती विभागाने या वेळी दिली. पवार यांनी सातही प्रवेशद्वारे सुशोभित करण्याचे निर्देश देत त्या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत. सुशोभीकरणाचे प्रस्ताव आल्यावर ते सीएसआर उपक्रमातून करायचे की पालिकेकडूनच करायचे, या संदर्भातील निर्णय नंतर घेतला जाणार आहे.

गर्दीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करा

शहरातील प्रवेशद्वारे चकचकीत करण्यासह शहरातील वाहतूक बेटे आणि गर्दीच्या ठिकाणांवरही पालिका अधिक लक्ष ठेवणार आहे. स्वच्छ व सुंदर नाशिक अशी नाशिकची ओळख असतानाही स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची कामगिरी दरवर्षी खालावत आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणावरील गर्दीची ठिकाणे आणि वाहतूक बेटे अधिक चकचकीत ठेवली जाणार आहेत. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणांचे, तसेच मुख्य ठिकाणच्या वाहतूक बेटांचेही सर्वेक्षण करण्याचे निर्देश पवार यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button