Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

मुंबई गोवा-महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग

चिपळूण : कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे. याचा मोठा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर झाला आहे. याच मार्गावर चिपळूण रत्नागिरी दरम्यान असलेल्या कामथे येथे रस्त्यावर मोठी भेग पडल्याने खळबळ उडाली आहे. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.

खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरड कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. तब्बल एक महिना कालावधीत हा घाट काहीकाळ वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. तरीही मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अनेक ठिकाणी अजस्त्र दरडी मार्गावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र या घाटातील वाहतूक तुर्तास सुरळीत आहे. चिपळूण शहरात गुरुवारी संध्याकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. चिपळूण नगरपरिषद प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सतर्क आहे.

खेड खोपीमधील सात घरांचे स्थलांतर

पावसाचा जोर लक्षात घेऊन खेड तालुक्यामधील मौजे खोपी जांभीळवाडी येथील दरडग्रस्त लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये एकूण सात कुटुंबांचा समावेश आहे. एकूण २४ जणांना हलवण्यात आले आहे. त्यामध्ये नऊ लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्व ग्रामस्थांना घराजवळच असणारी जुने राहते घर, तसेच जि. प. शाळा या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी सुरक्षेचा उपाय म्हणून वेळीच स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली.

दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा व खेड तालुक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाटवाहतुकीसाठी आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. आशा स्वरूपाचे आदेश खेड तालुका पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी जारी केले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button