TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमराठवाडामहाराष्ट्र

महावितरण ग्राहक, कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू!

लेखा अधिकारी-कर्मचारी यांचा राज्यस्तरीय मेळाव्यात निर्धार

छत्रपती संभाजीनगर : लेखा विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्या वेतनातील तफावत वर्ष 2023-28 च्या पुनर्निर्धारनात दूर करणे. भारती नियमावलीनुसार शैक्षणीक पात्रता ध्यानात घेऊन वेतन श्रेणी निश्चित व्हावी, यासह अनेक मागण्या शासनदरबारी मांडून त्या मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे एकमत महावितरणच्या कर्मचार्‍यांनी केले आहे. महावितरणच्या लेखा विभागाचा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार येथील मेळाव्यात सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांवर चर्चा केली.

या वेळी वित्त व लेखाचे उपव्यवस्थापक अमोल उमाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या मेळाव्या करीता राज्यभरातील महावितरण मधील 300 पेक्षा अधिक लेखा अधिकारी, कर्मचारी 16 परिमंडळातून व सांघिक कार्यालय तसेच सिव्हील झोन मधून उपस्थित होते.

या वेळी सर्वानुमते ठराव घेण्यात आले. यामध्ये लेखा विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्या वेतनातील तफावत वर्ष 2023-28 च्या पुनर्निर्धारनात दूर करणे. भारती नियमावलीनुसार शैक्षणीक पात्रता ध्यानात घेऊन वेतन श्रेणी निश्चित व्हावी. लेखा संवर्ग हा लेखा विषयातील तांत्रिकदृष्ट्या शिक्षीत असल्यामुळे वेगळ्या वेतनश्रेणी बरोबर सहाय्यक लेखापालचे सहाय्यक व्यवस्थापक, उच्चस्तर लिपिक (लेखा) चे वरिष्ठ लेखापाल तर निम्नस्तर लिपिक (लेखा) चे लेखापाल असे नामांतर करणे. कर्मचारी नियम हे उपविभाग कार्यालयावर नसून ग्राहक संख्येनुसार असावेत. लेखा कर्मचारी अधिकारी रिक्त पदभरती लवकरात लवकर व्हावी. यासह अनेक मागण्यांसाठी महावितरण लेखा विभाग कर्मचारी अधिकारी यांचा राज्यस्तरीय मेळाव्यात एकमुखाने ठराव पारित करण्यात आला. या वेळी उपस्थित संघटनांनी आपापल्या संघटनेच्या माध्यमातून प्रशासनासमोर व वेतन पुनर्निर्धारन समितीसमोर ठरावाबाबत मागण्या मांडण्याचे ठरविण्यात येणार आहे.

याप्रसंगी संघटना प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन झोनल सचिव कॉ. पी. व्ही. पठाडे, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे नंदकुमार जंगले, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अ‍ॅड. विनोद पाले यांच्यासह इतरही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या संघटनेची बाजू मांडली. या वेळी 22 कर्मचारी, अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला प्रतिनिधी म्हणून सोनल जोशी यांनी विचार मांडले. डॉ कृष्णा काळदाते यांनी सूत्रसंचालन केले. व्हीव्ही देवकर यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी पोतलवाड यांनी आभार मानले. छत्रपती संभाजीनगर येथील महावितरण लेखा अधिकारी, कर्मचारी नियोजन समितीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button