breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजनराष्ट्रिय

‘सेलेस्टीयल ब्यूटी अँण्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत- २०२३’ स्पर्धेत दिपाली करमुसे उपविजेती!

पिंपरी : गौरा फॅशन क्लब प्रेझेट्स ” सेलेस्टीयल ब्यूटी अँण्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत २०२३ (सीझन ४) या नेशनल लेव्हलच्या सौंदर्य स्पर्धेचा सोहळा सयाजी हॉटेल , कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात ९ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाला. मिसेस कॅटेगरी मध्ये पिंपरी चिंचवडच्या (महाराष्ट) दिपाली करमुसे ठरली पहिली उपविजेती.
संजय घोडावत ग्रूप चे चेअरमन श्री संजय घोडावत , ट्रस्टी श्री विनायक भोसले , सरस्वती साडी डेपो चे संचालक श्री शंकर दुल्हानी , आर्यन दुल्हानी , माणिकचंद आटा ग्रूप चे श्री प्रकाश आर. धारीवाल, श्री गिरीश शहा व फॉर्चून ग्रूप चे चेअरमन श्री वीरेन शहा यांच्या सहयोगाने सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे ६,७,८ जानेवारीला तिन दिवसांचे ग्रूमिँग गौरी नाईक व पेजन्ट कोच चैतन्य गोखले यांच्याकडून घेण्यात आले व ग्रँड फीनालेचा सोहळा ९ जानेवारी ला संपन्न झाला.
संपूर्ण भारतातून 300 ऑडिशन्स घेण्यात आले व त्यातून अंतिम 36 स्पर्धकांची निवड करण्यात आली.
रजनीश दुग्गल (मि.इंटरनेशनल , ग्रासिम मि.इंडिया २००३ ) , मिलिंद गुणाजी (अभिनेता , मॉडेल ) , डॉ. श्रद्धा जवानजाल ( प्रेसीडेंट सहारा नर्सिग एजुकेशन ) , सीमा अनिल इन्ग्रोले ( चेअरमन SDR फाउंडेशन ) व गौरी नाईक ( फाउंडर डाइरेक्टर , गौरा फॅशन क्लब ) यांनी परीक्षकांचे काम पाहिले तसेच श्री भारत सुरती ( जेड ब्लू ) यांनी मेन्स लाइफ स्टाइल पार्टनर व एफ हीना ब्युटीक चे संचालक श्री सायपन इनामदार यांनी लेडीज डिज़ाइनर पार्टनर म्हणून सहकार्य केले. मेकअप पार्टनर म्हणून LTA स्कूल ऑफ ब्यूटी चे संचालक वैशाली के .शहा , बिजू नायर व सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट सुप्रिया शिंदे यांनी काम पाहिले तसेच संदीप पाटील व स्वाती बाल्टे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.
भारत सुरती ( जेड ब्लू ) , डॉ अजित राजीगरे ( सार्थ आयुर्वेदा ) , बाबुराव चव्हाण ( धनलक्ष्मी ज्वेलर्स ) , शैलेजा दुनुन्ग ( हॉटेल संस्क्रुती ) यांनी सर्व स्पर्धकांना भेट वस्तू दिल्या.

या चार दिवसीय फॅशन शो चा समारोप झाला असून मिस गटामध्ये कोलकत्ता ( पश्चिम बंगाल ) येथील टिटास चॅटर्जी विजेती ठरली , पाहिली उपविजेती श्रुती साळवे अहमदनगर ( महाराष्ट्र ) तर दुसरी उपविजेती इशा भोसले कोल्हापूर ( महाराष्ट ) ठरली , मिस्टर गटामध्ये उस्मानाबाद ( महाराष्ट्र ) येथील आरेफ़अलि कोटवाल विजेता ठरला , पाहिला उपविजेता सातारा ( महाराष्ट्र ) येथील आदित्य धानधरपाळे तसेच कोल्हापूर ( महाराष्ट्र ) येथील रुद्र श्रावस्ती दुसरा उपविजेता ठरला .
मिसेस गटामध्ये नाशिक ( महाराष्ट ) येथील नयना बोडके विजेती ठरली , पाहिली उपविजेती दिपाली करमुसे पुणे ( महाराष्ट्र ) तसेच दिल्ली येथील मनीषा वर्मा दुसरी उपविजेती ठरली. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्याचा गौरव करण्यात आला. गौरा इवेंट्सच्या संचालिका गौरी नाईक व संचालक जयंत पाटील यांनी सर्व स्पर्धकांचे व कार्यक्रम यशस्वीते साठी प्रायोजक व उपस्थित मान्यवरांचे यावेळी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button