breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

दिनेश कार्तिकचा सर्वत्र बोलबाला! जाणून घ्या DK ची इन साईड आणि आऊट साईड स्टोरी

Dinesh Karthik | राजस्थान रॉयल्स बंगळुरूचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. काल राजस्थान रॉयल विरुद्ध तो आयपीएलमधील शेवटचा सामना खेळाला आहे. त्यानी त्याच्या कारकिर्दीत अनेकवेळा यशाला गवसणी घातली आहे.

दिनेश कार्तिकचा आयपीएल २०२४ पर्यंतचा प्रवास :

सुरुवातीच्या मोसमापासून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिकचा समावेश होतो. कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावली आहे. त्याने २५७ सामन्यात २२ अर्धशतकांसह ४८४२ धावा केल्या आहेत.

कार्तिक आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या १० खेळाडूंमध्ये सामील आहे. या कालावधीत कार्तिकने १४७ झेल आणि ३७ स्टंपिंगही घेतले. तसेच आयपीएल २०२४ च्या १५ सामन्यांमध्ये ३२६ धावा केल्या आहेत.

हेही वाचा    –    ‘भारतात पैशाची नाही तर प्रामाणिक नेत्यांची कमतरता’; नितीन गडकरींचं विधान 

दीपिकाच्या एन्ट्रीनं कार्तिकचं आयुष्य बदललं :

दिनेश कार्तिकचे क्रिकेट करिअर अनेक चढ-उतारांचे राहिले आहे. दिनेश कार्तिक एकदा प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता. कारण २००७ मध्ये २१ वर्षीय दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारासोबत लग्न केले.

लग्नाच्या ५ वर्षानंतर निकिताने स्वारस्य गमावण्यास सुरुवात केली आणि तामिळनाडूमध्ये कार्तिकचा सहकारी असलेल्या मुरली विजयच्या प्रेमात पडली.

२०१२ मध्ये दिनेश कार्तिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यावेळी तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर होऊ लागला. याच कारणामुळे तो टीम इंडियातून बाहेर फेकला गेला.

कार्तिक अशा अवस्थेत असल्याचे समजल्यानंतर त्याचा मित्र अभिषेक नायरने त्याला नैराश्यातून बाहेर काढले आणि त्यानंतर भारतीय स्क्वॉश चॅम्पियन दीपिका पल्लीकलची आणि कार्तिकची भेट झाली आणि तिने दिनेश कार्तिकला पुन्हा मैदानात उतरवले.

मात्र या काळात कार्तिक आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्नही केले आणि पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button