breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

भारतातील मधुमेह रुग्णांसाठी स्वस्तात मिळणार स्वदेशी इन्सुलिन! पाहा किंमत

Diabetes Insulin : भारतातील मधुमेही रुग्णांना दिलासा देणारी बातमी आहे. टाइप वन आणि काही टाइप टू मधुमेहाच्या रुग्णांना दररोज इन्सुलिनची आवश्यकता असते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे रुग्ण दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन घेतात. मात्र आता मधुमेहाच्या रुग्णांना मेक इन इंडिया तंत्रज्ञानाने बनवलेले स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे हे इन्सुलिन अगदी स्वस्त दरात मिळणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे स्वदेशी इन्सुलिनची किंमत इतर ब्रँडच्या तुलनेत कमी असणार आहे. आता देशातील मधुमेहींना स्वदेशी Insuquik इन्सुलिन लवकरच उपलब्ध होणार आहे. या इन्सुलिनची जागतिक दर्जाची गुणवत्ता मजबूत क्लिनिकल प्रोग्रामद्वारे सुनिश्चित केली जाते. हे सर्व मेट्रो शहरे आणि टियर-II शहरांमध्ये देखील उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा  –  ‘कौटुंबिक भेटीगाठी, कुठेही मॅच फिक्सिंग नाही’; अजितदादाचं विधान चर्चेत

भारतात सुमारे ११ कोटी लोक मधुमेहग्रस्त

सध्या भारतात मधुमेहींची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. भारतात मधुमेह हा एक गंभीर आजार बनला आहे. सध्या देशातील प्रौढ लोकसंख्येपैकी ११.४ टक्के म्हणजे सुमारे ११ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. याशिवाय सुमारे १३ कोटी लोक प्री-डायबेटिस आहेत. त्यांची स्थिती फार कमी वेळात मधुमेहापर्यंत पोहोचू शकते. अशा कालात स्वस्त दरात इन्सुलिन उपलब्ध करण्याचा प्रयत्न USV आणि Biogenomics यांच्याकडून करण्यात येत आहे.

‘या’ किंमतीला मिळणार इन्सुलिन :

  • इन्सुक्विक कार्टिरिज : ७०० रुपये
  • इन्सुक्विक वीडी पॅन : ९१५ रुपये
  • इन्सुक्विक वायल : २३२१ रूपये.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button