breaking-newsTOP Newsक्रिडा

IPL2023Final : चेन्नई विरुद्ध गुजरात, आज होणार महामुकाबला!

IPL2023Final : आयपीएलचा फायनल सामना आज (२८ मे ) गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार हा सामना सुरू होण्यापूर्वी आयपीएल समारोप सोहळ्याचा कार्यक्रम असणार आहे. फायनलपूर्वी हा सोहळा संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार असून या समारोपात रॅपर & सिंगर किंग, डीजे न्यूक्लेया परफॉर्म करणार आहेत.

हेही वाचा – New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाचं लोकार्पण

यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स हे संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले होते. यापैकी चेन्नई-गुजरातमध्ये फायनल होऊन विजेत्या संघाला २० कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये बक्षिस मिळणार आहे. त्यानंतर इतर संघानाही बक्षिस देण्यात येणार आहे. दरम्यान, चेन्नईने आतापर्यंत चार वेळा तर गुजरातने एक जेतेपद पटकावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button