breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘ड्रग्सप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही’; देवेंद्र फडणवीस

नागपूर : ललित पाटील प्रकरणामुळे ड्रग्सचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक ठिकाणी ड्रग्सचा साठा सापडला आहे. या प्रकरणावर आज विधान परिषदेतही चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर चर्चा करून अंमली पदार्थांची विक्री, आयात-निर्यात थांबवण्याकरता कठोर पावलं उचलणार असल्याचे म्हटलं आहे.

ड्रग्सच्या मुद्द्यांवरून सचिन अहिर म्हणाले की, ड्रग्सचं प्रकरण हे मोठं नेक्सस आहे. यामध्ये अनेकजण गुंतलेले आहेत. ललित पाटील प्रकरण हे त्यासाठी उत्तम उदाहरण आहे. एका ड्रग माफियाला पुण्यातील येरवडा रुग्णालयात सात महिने पाहुणचार मिळतो. दरम्यान याच काळात ससूनच्या प्रवेशद्वारावर ड्रग्सचा मोठा सापडतो. यामध्ये अनेकांचे संबंध असतील. याप्रकरणात रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता संजीव ठाकूरांना अटक झाली नाही. याचा नेक्सस सापडायचा असेल तर त्यांची नार्को टेस्ट, डॉ. देवकातेंची नार्केटेस्ट आणि संजीव ठाकूरांना अटक करणार का? असे प्रश्न विचारत हे प्रकरण सीबीआयला देणार का? असा सवालही त्यांनी विचारला.

उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकप्रकारे जागतिक स्तरावर हे षडयंत्र सुरू आहे. मागच्या काळात आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले ड्रग्स सापडले आहेत. त्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे. मेड इन पाकिस्तानचे पॅकिंग होतं आणि त्यात ड्रग्स होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि डिजींची बैठक घेतली होती. त्यांनी यावेळी डेडिकेटेड एजन्सींना मदत करण्यास सांगून व्यवस्था सुरू करण्यास सागितलं आहे. यामुळे राज्यांतर्गत इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालं आहे. राज्यात रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतो.

हेही वाचा  –  देशातील पहिला प्रयोग; शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे जाणार पाणी

ड्रग्सच्या फॅक्टरी तयार केल्या आहेत, ते बंद करतो. ललित पाटीलने अशाचप्रकारे काही लोकांना केमिस्ट वगैरेंना धरून २०२० मध्ये फॅक्टरी चालू केली. त्यानंतर तो पकडला गेला. त्यानंतर काय घडलं ते माहित आहे. मला असं वाटतं की आता यासंदर्भात कुठेही कोणालाही सरकार पाठिशी घालणार नाही आणि घालू देणार नाही. कारण, आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे. हा एक प्रकारचा अटॅक आहे. याविरोधात अतिशय कडक मुकाबला झाला आहे. या केसमध्ये ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना ३११ खाली डिसमिस करून टाकलं आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचाही सहभाग मिळाला की त्यांना थेट डिसमिस केलं जाईल, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला.

शाळा-कॉलेजजवळच्या २३६९ पान टपऱ्या तोडून टाकल्या, ३८८७६ इ-सिगरेट्सवर कारवाई केली. हुक्का पार्लवर कारवाई केली आहे. ही कारवाई सुरू आहे. अनेक लोक सोपा पैसा मिळतोय त्यांना वाटतच नाही की आपण गुन्हा करतोय. त्यामुळे विक्री होतेय. कायदा आपल्याकडे आहे, तो अधिक कडक करण्यासंदर्भात महाराष्ट्राकडून प्रपोजल पाठवलं की आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खासगी डॉक्टरकडून आरोपी वैद्यकीय प्रमाणपत्र घेतात. त्यावरून न्यायालयातून जामीन वाढवला जातो. हे मोडून काढावंच लागेल. आमच्यावतीने हा प्रयत्न केला जाईल. ससून रुग्णालय ही टेस्ट केस आहे. ससूनमधील कारवाईतून आपल्याला संदेश द्यायचा आहे की हे चालणार नाही. अमित शाहांनी एक वाक्य म्हटलं होतं की, जगातले मोठे देश कॅनडा, अमेरिका, युरोपिअन देश हे ड्रग्सच्या लढाईत हरले. त्यामुळे त्यांनी ड्रग्सचा नियम केला. आपल्याकडे दारूला परवानगी आहे, तसं कॅनडामध्ये ड्रग्सला परवानगी दिली. पण भारतात आपण ही लढाई हरलेलो नाही. आपण आता ही लढाई लढलो आणि यावर आळा आणू शकलो तर ही वेळ आपल्यावर येणार नाही. तोच धागा ठरवून आम्ही या संपूर्ण प्रकरणात काम करतोय, किती मोठ मोठे ऑपरेशन्स केलेत आहे ती यादी भयावह आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button