breaking-newsUncategorizedपिंपरी / चिंचवड

इंदिरा महाविदयालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात झाले. शेळकेवाडी (पिंपळोली,ता. मुळशी) दि. 7 ते 14 जानेवारी या कालावधीत घेण्यात आले. या शिबिरात 28 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या राष्ट्रीय शिबिरात स्वयंसेवकांनी मुळशी तालुक्यातील पहिली देवराई साकारली. या देवराईमध्ये ऐंशी प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या 325 वृक्षांचे रोपण करुन आयुर्वेदाच्या अनुषंगाने आवश्यक सर्व वनस्पतींचे रोपण करण्यात आले.  याच शिबिरामध्ये शेळकेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील जमीनींची आरोग्यपत्रिका तयार करण्यात आली. शेतक-यांसोबत प्रत्येक गटातील मातीचे नमुने शास्त्रशुध्द पध्दतीने गोळा करून त्याचे नायट्रोजन, फॉस्फोरस, पोटॅशियम, मातीचा सामु आणि सेंद्रीय कब या घटकांवरती रासायनिक विश्लेषण करण्यात आले. यामुळे शेतक- यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेळकेवाडीची जमीनींची आरोग्यपत्रिक बनविण्याची प्रक्रीया सुरुच आहे.
या राष्ट्रीय सेवा शिबिरामध्ये विद्यार्थांनी लोकसहभागातील जैवविविधता परिपत्रक बनवून शेतक-यांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती घेतली. ज्यामध्ये पीक संरचना, किड, किटक, शेती, पाण्याचे स्त्रोत, पाण्यातील जैवविविधता आदी घटकांची माहिती घेतली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनासाठी आनंद पुसावळे, (संचालक, राग्राविसं यशदा), डॉ. सुमंत पांडे, (कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा)  कुलकर्णी, (भूकंप पुनर्वसन तज्ञ व जलनायक, यशदा) यांची उपस्थित होते. यावेळी शिबिरार्थींना अजित आपटे यांचे शिवछत्रपतींचे व्यवस्थापन आणि योगेश कदम, (लायन्स क्लब, सांगवी) यांचे ग्रामीण विकास या विषयांवरती मार्गदर्शन लाभले.  डॉ. नंदकुमार शिंदे, (सिम्बोयसीस) यांचे गांधीवाद या विषयांवरती मार्गदर्शन लाभले. तर प्रा. योगेश भुसारी यांनी व्यक्तीमत्व विकास या विषयांवरती व्याख्यान दिले. डॉ. चंद्रशेखर पवार यांनी भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीची दशा व व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान दिले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सुमीत सासणे (प्रकल्प अधिकारी), डॉ. चंद्रशेखर पवार (सहाय्यक प्रकल्प अधिकारी), यांनी हे शिबिर यशस्वी केले. प्रा. चेतन वाकळकर (समूह संचालक, इंदिरा समूह), डॉ. तरीता शंकर (संस्थापक, इंदिरा समूह) यांनी शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button