TOP Newsताज्या घडामोडीपुणे

सार्वजनिक-खासगी लोकसहभागातून रस्त्यांचा विकास

पुणे : लोहगाव मार्गे पिंपरी-चिंचवडकडे जाणारा वर्तुळाकार मार्ग आणि महंमदवाडी येथील चोवीस मीटर रुंदीचे विकास आराखड्यातील दोन रस्ते क्रेडिट नोटच्या माध्यमातून सार्वजनिक- खासगी लोकसहभागातून (पीपीपी) विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी दोनशे कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याबाबतची निविदा प्रशासनाकडून काढण्यात आली आहे.

विकास आराखड्यात महापालिकेने रस्ते विकसनाला प्राधान्य दिले आहे. मात्र रस्ते विकसनाला मोठ्या प्रमाणावर खर्च येत असल्याने रस्ते रखडले आहेत. भूसंपादन हेही रस्ते विकसन रखडण्याचे मोठे कारण आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रुंदीनुसार बांधकामांना परवानगी दिली जाते. त्यामुळे प्रत्यक्षात रस्ता अरुंद असला किंवा विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे रुंदी नसेल तरी बांधकामे उभी रहात असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे रखडलेले रस्त्यांचे काम सार्वजनिक खासगी लोकसहभागातून मार्गी लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार या तीन रस्त्यांसाठी दोनशे कोटींची निविदा काढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button