पिंपरी / चिंचवड

डांगे चौकातील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

पिंपरी l प्रतिनिधी

डांगे चौकातील इलिमेंट्स द फॅमिली स्पा या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली. स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. ही कारवाई सोमवारी (दि. 24) दुपारी साडेपाच वाजता करण्यात आली. यामध्ये सात महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

शुभांकर महेश जवाजीवार (वय 27, रा. जुना बाजार, खडकी), रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे (वय 43, रा. काळेवाडी फाटा, वाकड. मूळ रा. जळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महिला पोलीस नाईक संगीता जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक, वाकड येथील ओझोन स्प्रिंग बिल्डिंगमध्ये इलिमेंट्स द फॅमिली स्पा हे स्पा सेंटर आहे. त्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली.

आरोपींनी सात महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. पोलिसांनी सात महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button