breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली, बारामतीत बोलताना म्हणाले…

बारामती |

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणा साठी नेहमीच चर्चेत असतात.. परंतु स्पष्ट बोलत असतानाच असं काहीतरी बोलून जातात की नंतर त्यांच्यावर टीका व्हायला लागते. त्यांच्यासोबत यापूर्वी अनेकदा अशा प्रकारचे किस्से घडले आहेत. यामुळे नंतर त्यांना मनस्ताप आणि झाला आणि त्यांनी ते उघड उघड बोलूनही दाखवला आहे.. कधी कधी बोलता बोलता दादांची गाडी रुळावरून घसरते. असाच काही प्रकार बारामतीतल्या एका कार्यक्रमात रविवारी देखील घडला.

बारामती तालुक्यातील एका गावात एका जाहीर कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.. त्या भागातील निधी वाट पाहून बोलत असताना अजित पवार यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे पाहायला मिळाले. स्टेजवर उपस्थित असलेल्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, ” मामा इतरांचाही विचार करत जा.. राज्यमंत्री असल्यामुळे मलाही भरणे यांनाच निधी मागावा लागतो.

कारण इथल्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत.. पुढे बोलताना ते म्हणाले इथल्या तिजोरीच्या चाव्या जरी भरणेंच्या हातात असल्या तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे. मी तिजोरिच नाही उघडली तर काय देणार… घंटा ? अजित पवारांनी असे म्हणतात उपस्थित लोकांमध्ये हशा पिकला.. यानंतर आणि स्वतः चा सावरत आता बोलता बोलता गाडी घसरायला लागली आहे असं म्हणत ते पुन्हा एकदा ट्रॅकवर आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button