breaking-newsमुंबई

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 118 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा सामना करावा लागला आहे. मागील तीन महिन्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या महापालिकेच्या 118 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या 118 रुग्णांमध्ये 55 कर्मचारी हे पालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारे आहेत. या 118 रुग्णांमध्ये अनेक कर्मचारी रुग्ण हे रुग्णालयातून सुटटी घेऊन पुन्हा कामावर रुजू झाले असून या 118 मध्ये 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आजघडीला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 16 हजारपर्यंत पोहचला आहे. 240 जणांचा या महामारीत मृत्यू झाला आहे. दरम्यान दररोज 400 हून अधिक रुग्ण पालिका क्षेत्रात सापडत आहेत. या रुग्णांना रुग्णालयात तसेच विलगीकरण केंद्रात सोडणे, विलगीकरण केंद्रात या रुग्णाच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे, रुग्णालयात या रुग्णांना उपचार देणे, रुग्ण सापडलेल्या परिसरात फिरून इतर नागरिकाचा सर्व्हे करणे यासारखी कामे करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णाच्या आजूबाजूला वावरणाऱ्या पालिका कर्मचारी आणि डॉक्टर यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रकार वाढले आहे.

मागील तीन महिन्याच्या कालावधीत पालिकेच्या 118 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, आया, वाहन चालक यांच्यासह पालिकेतील उपायुक्त, लिपिक, शिपाई, अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगार यांचा समावेश आहे. या 118 कर्मचाऱ्यांमध्ये फक्त आरोग्य विभागातील आतापर्यत 55 जणांना कोरोनाची लागण झाली. यातील अनेक जणांनी कोरोनावर मात करत पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. तर दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button