पिंपरी / चिंचवड

घर दुरुस्तीसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला ठेवले उपाशी

पिंपरी l प्रतिनिधी

घराची दुरुस्ती करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेचा छळ केला. विवाहितेला मारहाण करून उपाशी ठेवले. याबाबत पती आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 एप्रिल 2001 ते 10 फेब्रुवारी 2022 या कालावधीत केशवनगर, कासारवाडी येथे घडला.

पती संतोष कुंडलिक सरजिने (वय 47, रा. केशवनगर, कासारवाडी) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची दुरुस्ती करण्यासाठी तसेच घरातील खर्चासाठी पैशांच्या स्वरूपात हुंड्याची मागणी केली. त्यासाठी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. उपाशी ठेऊन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार सुरेश मुंढे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button