breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बार्सिलोना’च्या धर्तीवर शहरात अमंलबजावणी कठीण, पण अशक्य नाही – आयुक्तांचा विश्वास

 ‘स्मार्ट सिटी एक्स्प्रो वर्ड काॅंग्रेस परिषदे’ची सर्वपक्षीय पदाधिका-याकडून पत्रकारांना दिली माहिती 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्पेनमधील बार्सिलोनाच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात नवनवीन विकास प्रकल्पांची अमंलबजावणी करणे कठीण असले, तरीही अशक्य काहीच नाही, अशा शब्दांत आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी माहिती दिली.  या दाै-याची आज (शुक्रवारी) महापाैर कक्षात झालेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेस महापाैर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे नगरसेवक सचिन चिखले, माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते. 

आयुक्त हर्डिकर म्हणाले की,  स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबरला पार पडलेल्या  ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेत स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ सहभागी झाले होते. जगातील १४६ देशानी व ७०० हून अधिक शहरांनी या सहभाग नोंदविला होता. ८४४ स्टॉलची प्रदर्शन होते. ४०० हून अधिक जागतीक दर्जाचे वक्ते होते. वेगवगेळ्या संकल्पना राबवून आपले शहर अधिकाधिक स्मार्ट कसे करता येईल,   या दाै-यात नागरी विकास, तंत्रज्ञान, सार्वजनिक परिवहन, सक्षमीकरण, पादचारी, क्रिडागंणे, पादचारी, सायकल ट्रॅक, हॉकर्स झोन आदी स्टाॅलची पाहणी करुन माहिती घेतली. लोकसहभागातून शहर विकास केलेली अनेक स्मार्ट सिटी त्या सहभागी झालेले होते.  ई-बाईक, ‘इलेक्‍ट्रिक’ बस, क्रीडा क्षेत्राला दिलेले मोठे स्थान, त्याच धर्तीवर शहरात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यात येईल.

तेथील सोयी-सुविधांनूसार पिंपरी चिंचवड विकास आराखड्यात त्यांचा समावेश करुन सुधारित योजना राबविण्यात येतील. शहरात प्रशस्त फुटपाथ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरण, सायकल ट्रॅक, प्रशस्त रस्त्यांचा समावेश असणार आहे, तसेच बार्सिलोना दौ-याचा खर्चाची प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण केली आहे. त्याचे सर्व ‘रेकॉर्ड’ ठेवले जाईल. त्यामध्ये कुठेही अनियमितता झाली नाही, असेही यावेळी सांगितले. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे सचिन चिखले आदींनी या दाै-यांची सविस्तर माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button