breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

दिल्ली ‘आप’ली ः MCD निवडणूक निकाल: ‘आप’ला बहुमत, 31 जागांवर आघाडी

  • 15 वर्षांच्या भाजपच्या सत्तेला खिंडार
  • आपने 104 जागा जिंकल्या; भाजप 83 वर विजयी, 19 वर आघाडीवर

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. ‘आप’ला बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 250 जागांपैकी आप 31 जागांवर आघाडीवर असून 104 जागा जिंकल्या आहेत. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 83 जागा जिंकल्या असून 19 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत. MCD मध्ये बहुमतासाठी 126 जागा आवश्यक आहेत. पंधरा वर्षे येथे भाजपची सत्ता होती.

सकाळपासूनच आपच्या पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झाला. कार्यालयाला पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवण्यात आले आहे. गेल्या वेळी ते पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवले होते. दिल्ली महानगरपालिकेच्या 250 प्रभागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झाले होते.

सकाळपासूनच आपच्या पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झाला. कार्यालयाला पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवण्यात आले आहे. गेल्या वेळी ते पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवले होते. दिल्ली महानगरपालिकेच्या 250 प्रभागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झाले होते.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार यावेळी जवळपास 50 टक्के मतदान झाले आहे. 2017 मध्ये एकूण 53.55% मतदान झाले होते. म्हणजेच आत्तापर्यंतच्या आकडेवारीची तुलना केली तर यावेळी 3 टक्क्यांनी कमी मतदान झाले आहे.

आप’च्या तृतीयपंथी उमेदवाराचा जोरदार विजय…!
सुलतानपूर माजरा हा विधानसभेत उपस्थित असलेल्या तीन प्रमुख वॉर्ड क्रमांक- 42 सुलतानपुरी- ए प्रभागांपैकी एक आहे. येथून आम आदमी पक्षाचे उमेदवार बॉबी किन्नर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या एकता जाटव यांचा पराभव केला. आम आदमी पार्टीने बॉबी किन्नरला येथे उमेदवारी दिली होती आणि माजी नगरसेवक संजय यांचे तिकीट नाकारले होते. ही जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, न्यायालयाने महिलांसाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्याचा अधिकार षंढ समाजातील लोकांना दिला आहे. त्यामुळेच आप पक्षाने ही सुवर्णसंधी हातातून जाऊ दिली नाही. सुलतानपुरी-ए प्रभागातून बॉबी किन्नर यांना संधी देऊन आप पक्षाने ही लढत अटीतटीची ठरवली.

निवडणुकीचे अपडेट्स…
दिल्लीत भाजप नेते हरीश खुराणा म्हणाले की, आम्ही कोरोनाच्या काळातही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काम केले. पुढचा महापौर भाजपचाच असेल, याची आम्हाला खात्री आहे. गेल्या वेळीही सर्वेक्षणात भाजपला 50 जागा मिळाल्या होत्या. पण आम्ही दोन तृतीयांश बहुमताने जिंकलो होतो.

आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले की, त्यांचा पक्ष 180 चा आकडा पार करेल. आम आदमी पक्षाला एकतर्फी विजय मिळेल.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत.
निकालापूर्वी ‘आप’चे नवे बॅनर, लिहिले की, एमसीडीमध्येही केजरीवाल, चांगले असणार 5 वर्षे.
आप कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. सोमवारी सायंकाळपासूनच गर्दी वाढली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button