breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे दीपोत्सव उत्साहात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने डांगे चौक, थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी २५०० दिव्यांमुळे स्मारक परिसर उजळून निघाला होता.

यावेळी शिववंदना देखील घेण्यात आली व अॅड देविदास शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुराष्ट्र या विषयावरती उपस्थित असलेल्यांना प्रबोधन करण्यात आले. तसेच नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना राज्य सरचिटणीस विद्यानंद मानकर सर, शहर अध्यक्ष सचिन चिखले, वाहतुक सेना लोकसभा उपाध्यक्ष अमर माळी, मनसे उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर, राजेश अवसरे, महिला सेना उपाध्यक्ष अनिता ताई पांचाळ, अभिषेक बारणे, उपाध्यक्ष विशाल मानकरी, सुशांत साळवी, मधुकर बच्चे, सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, बापु परांडे, विकास कदम आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन हेमंत डांगे, प्रदेश उपाध्यक्ष मनविसे व अनिकेत प्रभु शहर अध्यक्ष मनविसे यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button