breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्यांपासून थकीत ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी : नगरसेविका सिमा सावळे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

देशभरात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  स्वच्छता कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कंत्राटदाराकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून तक्रार करणाऱ्या कामगारानंना धमकावले जात आहे. या कामगारांचा प्रलंबित पगार तातडीने करण्यात यावा; अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

कोरोना मुळे लॉकडाऊन असताना आपला जीव धोक्यात टाकून संपूर्ण शहर झाडण्याचे काम सफाई कामगारांमार्फत करण्यात येत आहे. परंतु, मागील दोन महिन्यांपासून ठेकेदारांक्डून या कामगारांना पगार दिला गेला नाही. काही ठिकाणी पाच – सहा हजार रुपये देऊन या कष्टकऱ्यांची बोळवण केली जात आहे. तसेच पगार दिला नसल्याची तक्रार जे कामगार करत आहेत त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी ठेकेदाराकडून दिली जात आहे.  दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने काही कामगारांनी नगरसेविका सिमा सावळे यांच्याकडे धाव घेतली व आपली व्यथा मांडली. सावळे यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना फोन करून  या कामगारांचा प्रलंबित पगार तातडीने करण्यात यावा, अशी मागणी केली. 

अडचणीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच या स्वच्छता दुतांचे आभार मांडण्यासाठी संपूर्ण देशाने थाळी नाद केला व विविध ठिकाणी या कामगारांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे ठेकेदार मात्र या कामगारांच्या पिळवणूक करत आहेत. या कामगारांचा पगार थकविणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सिमा सावळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button