TOP Newsताज्या घडामोडीपुणे

ओदिशातील तिघांकडून ३२ किलो गांजा जप्त

पुणे : पुणे स्टेशन परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. अटक करण्यात आलेले तिघे मूळचे ओदिशातील असून त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचा ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.दायनिधी जनाराम नायक (वय २८), हिमांशू मॅथीव नायक (वय २२), कैलास तिबू नायक (वय ५०, तिघे रा. गाजापट्टी, ओदिशा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पुणे स्टेशन परिसरात गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी तिघेजण पुणे स्टेशन परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी युवराज कांबळे आणि नितीन जगदाळे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून तिघांना पकडले.

त्यांच्याकडील असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. तपासणीत पिशवीत गांजा असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ३२ किलो गांजा आणि मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक चव्हाण, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी आदींनी ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button