TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

आयडॉल प्रवेशासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षण संस्थेच्या (आयडॉल) माध्यमातून अनेकजण नोकरी आणि विविध क्षेत्रात कार्यरत राहून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतात. यंदाच्या जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अशा २४ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ ते १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी ही शेवटची संधी असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत या सत्रात ४८ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पदवीस्तरावरील बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुद्धा ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. यावर्षी प्रथमच तृतीय वर्ष कला शाखेत मानसशास्त्राचे सहा विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने होणार असून विद्यार्थी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतील. त्याचसोबत विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या पदव्युत्तर पदवी स्तरावरील मानसशास्त्र, पत्रकारिता आणि जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमांनाही मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येतील. त्यामुळे माध्यम व जाहिरात क्षेत्रात काम करत असलेल्याना आता त्या विषयाचे पदव्युत्तर शिक्षणही घेता येणार आहे. दूर व मुक्त शिक्षण संस्थेने (आयडॉल) चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी या विभागीय केंद्रावर प्रवेशासंबंधी मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच अध्ययन साहित्यही मिळू शकेल. लवकरच पालघर येथेही विभागीय केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button