breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा गोळीबार; एक जण ठार

पिंपरी | प्रतिनिधी 
पिंपरी-चिंचवडमधील काटेपुरम चौक येथे भरदिवसा एकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. ही घटना साडेदहाच्या सुमारास घडली असून यात योगेश जगताप हे जखमी झाले आहेत. त्यांना दोन गोळ्या लागल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास योगेश जगताप हे काटे पुरम चौकात असताना अचानक त्यांच्यावर एकाने गोळ्या झाडल्या. ते पाहून जगताप पळत सुटले, त्यांच्यात झटापट झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. आरोपीने जगताप यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या असून पैकी दोन त्यांना लागल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जगताप यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हा चौक नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली आहे. ही माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप गोळीबाराचे कारण समजू शकलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button