TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीसह समाविष्ट गावांमध्ये दहीहंडी उत्साहात

  • आमदार महेश लांडगे यांची ठिकठिकाणी भेट
  • राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्फूर्त सहभाग

पिंपरी । प्रतिनिधी
कोविड काळात दोन वर्षे दहीहंडी उत्सव सार्वजनिकपणे साजरा करता आला नाही. मात्र, यावर्षी भोसरीसह समाविष्ट गावांत दहीहंडी उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शहरातील सर्वच दहीहंडी उत्सवांना उपस्थिती दर्शवली. सेलिब्रेटी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
दहीहंडी उत्सवानिमित्त भोसरी आणि परिसरातील मंडळांचा लौकीक आहे. भैरवनाथ कबड्डी संघाने भोसरी पी.एम.टी चौकात मानाची दहीहंडी उभारण्यात आली. यावर्षी अपंगत्व किंवा अपघातात शरीराचा भाग गमावलेल्या नागरिकांसाठी कृत्रिम अवयव देण्यात आले. या दहीहंडी उत्सवासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम’अभिनेत्री प्राजक्ता माळी, सेलिब्रेटी अँकर दिप्ती हालवाई यांचे प्रमुख आकर्षण होते. युवा नेते योगेश लांडगे आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले होते. अष्टविनायक मंडळ, चाकण गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. मुंबई, पुणे, बारामती आदी भागातील गोविंदा पथके उत्सवात सहभागी झाले.
चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पुढाकाराने आणि शिवरक्त प्रतिष्ठानतर्फे घरकूल येथील मेन सर्कल येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख आकर्षक ‘बीग बॉस’व ‘माझ्या नवऱ्याची बायको फेम’मीरा जगन्नाथ हीने उपस्थिती दर्शवली. चेंबूर- मुंबई येथील रिद्धी-सिद्धी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. त्यांना ५ लाख ५५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.


भाजपा महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षा सोनम जांभूळकर- जाधव यांच्या पुढाकाराने वुड्सव्हिले फेज-२, चिखली येथे उत्सव आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अक्षया देवधर उपस्थित राहणार आहेत.
माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे आणि नागेश्वर महाराज दहीहंडी महोत्सवचे अध्यक्ष गणेश सस्ते यांच्या पुढाकाराने मोशी येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सव झाला. जय गणेश युवा फाउंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘हाउसफूल-२’ फेम शाझहान पदमसी, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’फेम प्राजक्ता गायकवाड, ‘मन उडू उडू झालं’फेम रीना मधुकर, ‘मुरंबा’फेम आरुष बाणखेले यांनी बाळ-गोपाळ आणि प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. जित्राई माता मित्र मंडळ, चाकण गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.


दिघी गावठाण येथे डोळस मैदानावर माजी नगरसेवक विकास डोळस, संजय गायकवाड आणि कुलदीप परांडे यांच्या पुढाकाराने अखिल दिघीगाव दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी अमृता गोसावी आणि ‘धर्मवीर’आणि ‘मुळशी पॅटर्न’फेम क्षितीज दाते यांची प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित होती. चाकण येथील माऊली गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
जाधववाडी- चिखली येथील रामायण मैदानावर श्री. संतोषतात्या जाधव युवा मंचतर्फे आणि माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या पुढाकाराने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘खुलता कळी खुलेना’फेम ओमप्रकाश शिंदे, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम अश्विनी महांगडे, सिने अभिनेते भगवान पाचोरे, ‘सुख म्हणजे नक्की काय असते’फेम माधवी निमकर, रिल्स स्टार पै. अभि गायकवाड यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
*
मंचरमध्येही आमदार लांडगे समर्थकांचा उत्साह…
भोसरीसह पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला. मंचर येथील पै. महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनआणि लोकमान्य प्रतिष्ठानतर्फे १ लाख ११ हजार १११ रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. तसेच, प्रत्येक सलामी देणाऱ्या पथकास ११ हजार १११ रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.
**
शहरातील पहिली महिला सार्वजनिक दहीहंडी…
पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली महिला सार्वजनिक दहीहंडी उत्सव श्री. वसंतनाना लोंढे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आली. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे या उत्सवाच्या प्रमुख आकर्षण होत्या. ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक असलेल्या या दहीहंडीचे संयोजन न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमातून क्रांतीनाना मळेकर यांनी केले. बाल शिवराज महिला गोविंदा पथक, मुंबई गोविंदा पथकाने ही मानाची दहीहंडी फोडली. रणरागिणी शिवकालीन युद्ध कला पथकाने गोविंदा आणि प्रेक्षकांचा उत्साह वाढवला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button