breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत वाहनांवर दगडफेक करणाऱ्यांना अटक

पिंपरी – विद्यानगर येथे उभ्या केलेल्या ट्रकच्या काचा फोडून ट्रकचालक व त्याच्या सहकाऱ्यास मारहाण करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनीशुक्रवारी अटक केली आहे. अमित बाबर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर ही कारवाई झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरदीन शेख, सागर झोरबाडे, सुग्रीव काळे, अजय बारसकर, दिपक गिरी या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाहनांवर दगडफेक घडल्याचा प्रकार गुरूवारी रात्री घडला होता. विद्यानगरजवळील मोकळ्या जागेत काहीजण मद्यप्राशन करीत बसले असल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. तातडीने पोलीस घटनास्थळी आले. त्यावेळी मद्यपींनी तेथून पलायन केले होते. आजुबाजुला कोणीच नव्हते. केवळ ट्रक उभे होते. या ट्रकजवळ चालक आणि क्लिनर थांबलेले होते. त्यांनीच पोलिसांना माहिती दिली असावी, असा समज झालेल्यांनी ट्रकवर दगडफेक करून काच फोडली. तसेच ट्रकजवळ थांबलेल्या राजेशकुमार साह आणि परमेवर श्रीमल साव या दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ट्रकचालक, क्लिनर यांना मारहाण आणि वाहनाचे नुकसान केल्याबद्दल अमित बाबर यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या फिर्यादीची दखल घेवुन पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी आजुबाजुच्या परिसरात चौकशी केली असता, दत्तनगर, शंकरनगर परिसरात चार आणि चिखली परिसरात एक असे पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. बहुतांशी आरोपी दत्तनगर, शंकरनगर परिसरात राहणारे असून एक आरोपी मात्र चिखली मोरेवस्ती येथे राहणारा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button