breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली यंदाची विश्वसुंदरी..!

Miss World 2024 : जवळपास दोन दशकांनंतर भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला. मुंबईतील जिओ सेंटर मध्ये यासाठी जगभरातील सौंदर्यवती, फॅशन विश्वातले दिग्गज आणि मनोरंजन दुनियेतील तारे दाखल झाल्या होत्या. यंदा साऱ्यांचेच लक्ष असेल ते अंतिम फेरीत पोहचलेल्या भारताच्या सिनी शेट्टीकडे. पण मिस वर्ल्ड २०२४ या किताबावर चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने नाव कोरलं. लेबनॉनची यास्मिना उपविजेती ठरली आहे. या सोहळ्यासाठी बॉलीवूडकरांनी देखील हजेरी लावली. विशेष म्हणजे या सोहळ्याच्या परीक्षकांच्या खुर्चीत  क्रिती सॅनॉन आणि पूजा हेडगेसह अमृता फडणवीस देखील बसल्या होत्या.

यंदाच्या या स्पर्धेत १२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या सर्वांना मागे सारत  क्रिस्टीना पिस्कोव्हाने विश्वसुंदरीचा किताब तिच्या नावावर केलाय. मागील वर्षी ही स्पर्धा पोलंडच्या कॅरोलिना बिलावस्का हिने जिंकली होती सिनी शेट्टीने भारताचं प्रतिनिधीत्व या स्पर्धेत केलं होतं. पण तिला विजेतेपदावर नाव कोरता आलं नाही. सिनी ही टॉप ८ पर्यंत पोहचली. पण तिला टॉप ४ मध्ये भाग घेता आला नाही. त्यामुळे ती या स्पर्धेतून बाहेर पडली.

हेही वाचा – ‘पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करणार’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेसाठी १२ जजचं पॅनल होतं. यामध्ये  बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे यांच्यासह मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, अमृता फडणवीस, साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी मिस वर्ल्ड २०२४ या स्पर्धेचं परीक्षण केलं असून यंदाची मिस वर्ल्ड अमृता फडणवीस यांनी यंदाची मिस वर्ल्ड निवडली आहे.

मिस वर्ल्ड २०२४ हा सोहळा ‘सोनी लिव्ह इंडिया’वर लाइव्ह करण्यात आला होता. तसेच या स्पर्धेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी  करण जोहर आणि मेगन यांग हे दोघांनी केलं. तसेच या स्पर्धेत शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर यांचा धमाकेदार परफॉर्मन्स केले. आता २०२४ ची विश्वसुंदरी संपूर्ण जगाला मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button