breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

#CoronaVirus: करोना थांबवणं आता तुमच्या हाती! म्हणत WHO ने केलं भारताचं कौतुक

करोना थांबवणं आता तुमच्या हाती आहे असं म्हणत WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताचं कौतुक केलं आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४९९ वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. भारत करोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावलं कठोर असली तरीही योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरु ठेवलं पाहिजे असंही WHO ने सुचवलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.

काय म्हटलं आहे रेयान यांनी?

” चीनप्रमाणेच भारत हा देखील बहुसंख्य लोक असलेला देश आहे. या देशात करोनाचं जे संकट ओढवलं त्यानंतर आक्रमक निर्णय घेण्यात आले. करोनाशी लढा देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय योग्यच आहेत. लोकांच्या आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आत्ताही दिसून येते आहे. ”

भारतात करोनाग्रस्तांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ९० च्या वर गेली आहे. सरकारने सर्वतोपरी काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button