breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Cyclone Nisarga: सतर्क…! अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचं अखेर चक्रीवादळात रुपांतर

अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्यानं आता चक्रीवादळाचं रुप धारण केलं आहे. पुढच्या बारा तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार आहे. इथं वाऱ्याचा वेग १०० ते ११० किमी प्रतितास असेल. तो १२० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती IMD मुंबईच्या दक्षता अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली आहे.

भुते यांच्या माहितीनुसार, “हे चक्रीवादळ मुंबईपासून ४३० किमी दूर तर गोव्यापासून २८० किमी दूर आहे. ३ जूनच्या दुपारपासून हे चक्रीवादळ दमण आणि हरिहरेश्वरपासून अलिबागच्याजवळ रायगड जिल्हा ओलांडण्याची शक्यता आहे. या तीव्र चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगडच्या काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग हा १०० ते ११० किमी प्रतितास असेल.

ज्यावेळी हे चक्रीवादळ या भागातून जाईल तेव्हा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही भुते यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button