breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रेकॉर्डवरील २ गुन्हेगारांना खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

पिंपरी । प्रतिनिधी

मारहाणीच्या गुन्ह्यात गेली काही दिवसांपासून फरार असलेल्य रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली.

धनंजय ऊर्फ बबल्या सूर्यकांत रणदिवे (२२, रा. सेक्टर नंबर २२, ओटास्कीम, निगडी), सचिन गुलाब जाधव (२२, रा. राहूलनगर, ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ३ सप्टेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरनामसिंग कांचनसिंग जुन्नी (वय २१, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी धनंजय आणि सचिन यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुन्नी आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी आपसात संगनमत करून २ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांवर हल्ला केला. पालघन, कोयता, फायटर, तलवार आणि लोखंडी पाईपने आरोपींनी तिघांना बेदम मारहाण केली.

या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी दरोडा विरोधी पथक करत होते. खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी रविवारी (दि.१३) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील टॉप २५, तडीपार, फरारी आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक निशांत काळे व पोलीस शिपाई राजेश कौशल्य यांना माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील आरोपी देहू फाटा आळंदी येथे येवले चहाच्या दुकानासमोर थांबले आहेत.

पोलिसांनी सापळा रचून धनंजय आणि सचिन यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यावरून दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button