Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मेळावे घेत बंडखोरांवर टीकास्त्र

जळगाव : आमदार आणि खासदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मेळावे घेत बंडखोरांवर टीकास्त्र सोडलं जात आहे. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथेही शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आणि बंडखोरांविरोधात रान पेटवण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या मेळाव्यात एका मद्यपीने व्यासपीठावर भाषण करणारे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांना रोखले आणि त्यानंतर त्यांच्या हातातून माईक घेत जोरदार भाषणही केली. या भाषणाची जिल्ह्यात आता चांगलीच चर्चा होत आहे.

चिंचोली येथे आयोजित मेळाव्याला शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. त्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत भाषणासाठी उठले. त्यांनी भाषण सुरू केले. मात्र त्यानंतर काही मिनिटांत उपस्थितांमधून एक जण उठला आणि बंडखोरांविरोधात डायलॉगबाजी करत भाषणाला सुरुवात केली.

‘शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येतात…’

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील इतर आमदारांना उद्देशून सदर व्यक्तीने म्हटलं की, ‘शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येतात. निवडून आल्यावर हे करू आणि ते करू, अशी मोठमोठी आश्वासने देतात. मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाही. आमच्या गावात पूल नाही म्हणून शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे. जिल्ह्यातील नेते नुसते भटकून राहिले, परंतु पूल काही झाला नाही.’

सभास्थळी हसून-हसून सर्वजणच लोटपोट

‘ते आमदार विमानाने गुवाहाटी काय, गोवा काय फिरून राहिले. काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले. यांना मजा मारायला निवडून दिले का? एक म्हणतो मी मुख्यमंत्री अन् दुसरा म्हणतो मी उपमुख्यमंत्री. उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी त्याग केला. सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे होते. जो फुट गया व तूट गया,’ हा डायलॉग मारुन सदर व्यक्तीने आपले भाषण संपवले. या भाषणावेळी करण्यात आलेल्या डायलॉगबाजीने उपस्थित संपर्कप्रमुख, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते चांगलेच लोटपोट झाल्याचं तसंच सर्वांनी त्याला टाळ्या वाजवून दाद दिल्याचं पाहायला मिळालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button