breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

अजित पवारांची टीका राज ठाकरेंच्या जिव्हारी, नक्कल करत म्हणाले, ‘लाव रे व्हिडीओ’

ठाणे : महाविकास आघाडीतील ज्या ज्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्याच्या भाषणावर टीका केली, त्या टीकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या उत्तर सभेतून ‘प्रत्युत्तर’ दिलं राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तुटून पडले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पुन्हा जातीयवादी राजकारण केल्याचा आरोप केला. तर जयंत पाटील यांचा उल्लेख जंत पाटील असा करत त्यांच्यावरही ठाकरी भाषेत टीकास्त्र सोडलं. ईडीच्या नोटीसीने राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या आडनावावर राज ठाकरेंनी कोटी केली. सुप्रियांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, असं ते म्हणाले. या सगळ्यात अजितदादांनी केलेली टीका राज ठाकरेंच्या खूपच जिव्हारी लागली. अखेर पुन्हा लाव रे व्हिडीओ म्हणत भोंग्यांसंदर्भातील माझी भूमिका आजची नाही, अजित पवार माझं भाषण लक्ष देऊन ऐका म्हणत राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वीच्या सभेचे तीन व्हिडीओ दाखवले.

अजित पवार यांचा आवाज काढत लाडके अजित पवार काय म्हणातायेत ते बघा… असं राज म्हणाले. त्यांनंतर त्यांनी अजितदादांचं विधान वाचून दाखवलं. त्यांचा एक आवडता शब्द आहे पठ्ठ्या… याला काय म्हणे भोंगे आताच दिसले का? भोंग्यांविरोधी भूमिका घ्यायला आताच सुचली का? याअगोदर काय झोपा काढल्या का?…. अजित पवार मी कधी-कधी कोणती-कोणती गोष्ट बोललोय ना हे मला नीट आठवतंय… तुमच्या फक्त माहितीसाठी मी तीन व्हिडीओ आणलेत…. असं म्हणून राज ठाकरे यांनी आपल्या याअगोरदच्या भाषणाचे व्हिडीओ सभेत दाखवले.

राज ठाकरेंनी सभेत दाखववेल्या तिन्ही व्हिडीओतून भोंगेविरोधी भूमिका आताची नसून याअगोदरची आहे, तसंच वेळोवेळी ही भूमिका मी जाहीर सभांमधून मांडतो आहे, हेच राज ठाकरे यांनी सांगितलं. तिन्ही व्हिडीओ सभेत दाखवल्यानंतर मनसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या उमेदवारांची मोळी आहे. निवडून येणाऱ्या लोकांची एकत्र करुन बांधलेली मोळी म्हणजे पवारांचा राष्ट्रवादी…., अशी टीका राज ठाकरे यांनी केला. तसंच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, या मतावर मी आजही ठाम असेल आणि इथून पुढेही माझं तेच मत असेल, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं किंबहुना राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात बोलताना केली. त्यांच्या टीकेला खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादा स्टाईलने राज ठाकरेंना उत्तर दिलं होतं. “व्वा रं पठ्ठ्या… साहेबांचं सगळं राजकारण बघितलं तर कुठे जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्व धर्म समभावाचं राजकारण केलं. पण हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावं आता…”, असं अजित पवार म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button