पुणे

नामांकित सराफाचे 22 लाखाचे सोने घेऊन कारागीर फरार

पुणे | पुण्यातील नामांकित सराफाकडे काम करणाऱ्या एका कारागिराने तब्बल 22 लाख रुपये किमतीचे सोने घेऊन पळ काढला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पाल (वय ५६) यांनी तक्रार दिली आहे. यानुसार पलास बादलजाना (वय २७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कारखाना आहे. ते मोठ मोठ्या सराफी दुकानदारांचे नक्षीदार दागिने बनवून देण्याचे कामे घेतात. तेथे पलास काम करत असे. गेल्या एक ते दिड वर्षांपासून काम करत असे. त्याच्याकडे सोने आणून दिल्यानंतर त्याचे दागिने बनविण्याचे काम त्याचे असायचे.

दरम्यान, त्यांनी एका नामांकित सराफी व्यावसायिकांनी त्यांना ऑर्डर दिली होती. त्यानुसार, पलास याच्याकडे ५७८ ग्रॅम सोन्याचे लगड दिली होती. पण, पलास याने दागिने न देता २२ लाख ५५ हजार रुपयांचा अपहार केला आहे. २८ जुलै ते २५ ऑगस्टपर्यंत या कालावधीत घडला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील हे करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button