breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#Covid-19: Taarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण

मुंबई: तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहेय या मालिकेमध्ये दिसणारी रीटा रिपोर्टर अर्थात प्रिया आहूजा राजदा कोरोना पॉझिटिव्ह आहे. प्रिया आहूजाने याबाबत स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. या मालिकेत काम करणाऱ्या जेठालालसह अनेक कलाकारांनी देखील ती लवकर बरी व्हावी याकरता प्रार्थना केली आहे.

प्रिया आहूजा राजदाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि त्यासह एक लांबलचक पोस्ट देखील लिहीली आहे. या नोटमध्ये तिने लिहिले आहे की, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि याबाबत मी तुम्हाला सूचित करणे माझे कर्तव्य आहे. माझ्यात व्हायरसचे कोणतेही लक्षण नाही आहे. जे कुणी गेल्या 2-3 दिवसात माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. मी आतापर्यंत घरीच होते आणि शूटिंग देखील करत नव्हते तरी देखील मला कोरोना झाला. स्वत:ला सुरक्षित ठेवा आणि मास्क घालण्यास विसरू नका.’

https://www.instagram.com/p/CFuFqYdpwrn/?utm_source=ig_embed
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button