breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

COVID 19 : शहरात आज एकूण 46 जणांना कोरोनाची लागण, 17 महिलांचा समावेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील विविध भागातील 46 जणांचे आज शनिवारी (दि. 23) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. 29 पुरुष आणि 17 महिलांचा त्यात समावेश आहे. आजपर्यंतची ही सर्वांत मोठी रुग्णसंख्या आहे. सायंकाळी आठ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 311 वर गेली आहे. त्यातील 169 रुग्ण बरे झाले आहेत. आजमितीला 135 सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले आहे. कालपासून शहरातील निर्बंध शिथील केले आहे. परंतु, कालपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. काल एकाचदिवशी 21 जणांचे तर आज आत्तापर्यंत 46 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंतची सर्वांत मोठी ही रुग्ण संख्या आहे. एकाचदिवशी 46 रुग्ण वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. झोपडपट्टीतील 80 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर झोपडपट्टी, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडीतील असे 46 रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुण्यातील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शहरातील 311 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 169 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 135 सक्रिय रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील 123 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. पण, कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. आज आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, सात जणांमध्ये लक्षणे असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. आजपर्यंत शहरातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे .

कोणत्या वयोगटातील किती जणांना कोरोनाची बाधा ? कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक युवकांमध्ये आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 130 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 46 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 34 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 29 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button