breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: चप्पल व बुटांमुळे होऊ शकतो कोरोना?- WHO

नवी दिल्ली: चीनच्या वूहान शहरामधून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत जवजवळ सर्व देश काबीज केलेले आहेत. साधारण फेब्रुवारीमध्ये भारतामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. यादरम्यान जगातील आरोग्य संघटना, काही प्रयोगशाळा, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स यांनी या विषाणूबाबत लोकांना माहिती देण्यास सुरुवात केलेलीआहे. हा विषाणू नक्की कसा होतो, त्यासाठी काय काळजी घ्यायची याबाबत लोकांमध्ये जनजागृती घडू लागलेली आहे. कपडे, धातू किंवा इतर गोष्टींद्वारेही हा विषाणू पसरू शकतो, हे समजल्यावर आता एक प्रश्न आहे की, चप्पल किंवा बूट यांच्यामार्फतही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो? यावर डब्लूएचओने स्पष्टीकरण दिलेले आहे.

डब्लूएचओ च्या म्हणण्याप्रमाणे चप्पल किंवा बूट अशा पादत्राणांद्वारे कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. हा विषाणू चप्पल किंवा बुटाद्वारे फार कमी प्रमाणात पसरू शकतो. मात्र डब्लूएचओने पुढे म्हटले आहे की, खबरदारीचा उपाय म्हणून, विशेषतः ज्या घरात लहान मुले जमिनीवर रांगत आहेत किंवा जमिनीवर खेळतात अशा ठिकाणी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरच आपले शूज किंवा चप्पल काढावेत. अशा गोष्टी घरात घेऊन जाऊ नये. यामुळे लहान मुलांचा धुळीशी किंवा कोणत्याही घाणीशी कमी संपर्क येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button