breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुस्तीपट्टू आणि लेखापरिक्षक यांचा नगरसेविका सविता नरेश खुळे यांच्या हस्ते सन्मान

पिंपरी / महाईन्यूज

उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार मिळालेले राजू हिप्परकर तसेच ऋतिक संजय नखाते यांची ५७ किलो गटातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आणि ॲड. धनंजय कोकणे यांची पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या ऑडीटरपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका सविता खुळे व नरेश खुळे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची निवड चाचणी रहाटणी येथे घेण्यात आली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे यावेळी प्रथमच प्रेक्षकाविना हि निवड चाचणी पार पडली. यावेळी उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार राजू हिप्परकर यांना देण्यात आला. ५७ किलो वजनी गटातून रहाटणीचा ऋतिक संजय नखाते यांची निवड झाली. हे दोघेही महाराष्ट्र युवा केसरी किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

तसेच, रहाटणीचे ॲड. धनंजय कोकणे यांची पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या ऑडीटरपदी भरघोस मतांनी निवड झाली. या तिघांमुळे रहाटणी गावाचा सन्मान वाढला असल्याची भावना व्यक्त करत नगरसेविका साविता खुळे व नरेश आप्पा खुळे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button