breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहायक आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांचा राजीनामा

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (‘सीओ’ केडर) व्यंकटेश दुर्वास यांनी राजीनामा दिला आहे. 22 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्द केला. राजीनाम्याचे नेमके कारण समोर आले नसले तरी सत्ताधारी भाजपच्या कारभारामुळे अधिका-यांमध्ये नाराजी तर निर्माण झाली नाही ना ?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

वसई-विरार महापालिकेतून सहाय्यक आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांची पदोन्नतीने 18 जानेवारी 2021 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदली झाली होती. 19 जानेवारी रोजी वसई-विरार महापालिकेतून ते कार्यमुक्त झाले होते. त्यांना पिंपरी महापालिकेत 25 जानेवारी रोजी रुजू करुन घेण्यात आले. त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क आणि पशुवैद्यकीय विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. मात्र, महापालिकेत रुजू झाल्यानंतर महिन्याभराच्या आतच दुर्वास यांनी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

आपण वैयक्तिक कारणास्तव मुख्याधिकारी ‘गट-अ’ या पदाचा 22 फेब्रुवारी 2021 रोजी राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे मी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर काम करु शकत नसल्याचे दुर्वास यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button